भारतीय जनता पक्षाचे हे जनसेवा कार्यालय केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे उपकेंद्र म्हणून काम करेल- मंत्री चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पक्षाच्या डॉ.एकता विशाल रामदासी यांच्या कर्वेनगरमधील जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन
पुणे : कर्वेनगर मधील भारतीय जनता पक्षाचे हे जनसेवा कार्यालय केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे उपकेंद्र म्हणून काम करेल. अशी भावना राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
भारतीय जनता पक्षाच्या डॉ.एकता विशाल रामदासी यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाटील बोलत होते.यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेवक दीपक पोटे, राजाभाऊ बराटे, विठ्ठल बराटे, विशाल रामदासी यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पाटिल म्हणाले, देशात आणि राज्यात असलेल्या आपल्या सरकारच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न केले पाहिजेत. या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून मोठे काम सुरू व्हावे अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, विशाल रामदासी, डॉ . एकता रामदासी कर्वेनगर भागामध्ये गणेश मंडळ आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करत आहेत. या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून असेच चांगले काम सुरू राहणार आहे.






