पुणे शहर

पुणे महापालिकेची प्रभाग रचना झाली व्हायरल ? पण….

पुणे : पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना कधी जाहीर होती ?यासाठी इच्छुक उमेदवार वाट पाहत असतानाच गुरुवारी सायंकाळी अचानक एक प्रभाग रचनेची पीडीएफ सोशल मीडियावर वायरल झाली आणि सर्वांची एकच धावपळ उडाली.

मात्र ही प्रभाग रचना निवडणूक आयोगाने तयार केलेली नसून
माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी तयार केलेले आहे.याबाबत इच्छुक उमेदवार विविध पत्रकारांना फोन करून या प्रभाग रचनेविषयी खातरजमा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण अद्याप निवडणूक आयोगाने कोणतीही प्रभाग रचना जाहीर केलेली नाही.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

उज्वल केसकर म्हणाले, आम्ही जाहीर केले होते,प्रभाग रचना हा फार अवघड विषय नाही प्रशासन वेळ काढत होते,मागत होते तेव्हा ठरविले की आपण मार्गदर्शक सूचनेनुसार काही करू आणि केला हा प्रयोग आहे,आमचा दावा नाही की असेच प्रभाग होतील,अथवा केले पाहिजे अशी मागणी ही नाही,मनपा कडे असणारी यंत्रणा आमच्या कडे नसताना केले आहे, मनपा आयुक्त आणि इतर अधिकारी यांनी ठरवले असते तर 3 सदस्य प्रभाग रचना करण्याचा आदेश आल्यावर करता आला असता.

Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm
Img 20220108 wa0171

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये