पुणे शहर

लवकरच पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा सूरू होणार …

पुणे : कोरोना संसर्गामुळे गेल्या चौदा महिन्यांपासून बंद असलेली पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा सुरू व्हावी, या मागणीसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सर्वपक्षीय गटनेत्यांसह आयुक्त उपस्थित होते.(The general meeting of Pune Municipal Corporation will resume soon )

मोहोळ म्हणाले, सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी नसल्याने अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबित असून विकासाच्या दृष्टीने मोठी अडचण निर्माण झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच यासाठी आपण सातत्याने मुख्यमंत्री,नगरविकास मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करुन सर्वसाधारण सभा पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्याशी पुन्हा संवाद साधला.अजितदादांचे यासंदर्भात नगरविकास खात्याच्या सचिवांशी संवाद झाला असून त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

Img 20210516 094854

यावेळी उपमहापौर सुनिता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते साईनाथ बाबर आणि आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते.

Img 20210522 wa0027

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये