पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे उद्या आगमन, पालखीचे स्वागत पालिका आयुक्त करणार

पुणे महापालिका प्रशासन सज्ज
पुणे – यंदाचे वर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शहरात रविवार दिनांक ३० जून रोजी आगमन होत असून, महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले स्वागत करणार आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन आळंदी रस्त्यावरील कळस क्षेत्रिय कार्यालय येथे दुपारी १२.३० वाजता होईल. त्या प्रसंगी प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले पालखीचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत. तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन बोपोडी सिग्नल चौक येथे दुपारी १.३० वाजता होईल. डॉ. राजेंद्र भोसले पालखीचे स्वागत करतील. दुपारी ४ वाजता मुंबई पुणे रस्त्यावरील नाबार्ड बँकेसमोरील पाटील इस्टेट वसाहती शेजारी दोन्हीही पालख्यांचे एकत्रित दर्शन घेऊन स्वागत करतील.
दोन्ही पालख्या मंगळवार दिनांक २ जुलै रोजी प्रस्थान करतील. हडपसर गाडीतळ येथे, सकाळी ९ वाजता डॉ.भोसले महापालिकेच्यावतीने निरोप देतील.










