पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना दिली महत्वाची माहिती ; ३ मोठे निर्णय केले जाहीर..

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक देशाला संबोधित करत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी तीन मोठे निर्णय आज जाहीर केले त्यामध्ये 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला-मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 3 जानेवारी 2022 पासून या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच साठ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना जे कोमॉब्रिड आहेत त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने प्री कॉशनरी लस घेण्याचा पर्याय उपलब्ध असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याची सुरावात १० जानेवारी पासून केली जाणार आहे.
रुग्ण संख्या वाढत असली तरीही कोणीही घाबरून न जाता सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, नियम पाळावेत असे आवाहन मोदी यांनी केले आहे. लसीकरणात भारताने मैलाचा दगड पार केला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
देशात १८ लाख आयसोलेशन बेड तर ५ लाख ऑक्सीजन सपोर्टेड बेड आहेत. १ लाख ४० हजार आयसियु बेड आहेत . ४ लाख ऑक्सीजन सिलेंडर देशभरात दिले असल्याचे त्यांनी सांगितले. चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले
लवकरच देशात नेसल आणि डीएनए लसीनांही मान्यता मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयान दिलेल्या माहितीनुसार देशभरात आतापर्यंत ओमिक्रॉन ४१५ रुग्ण सापडले असून त्यातील ११५ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉन रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या १०८ वर गेली असल्याचे ते म्हणाले.




