कर्वे रस्त्यावरील हुतात्मा राजगुरू यांच्या अर्धाकृती शिल्पाचे लोकार्पण

मुरलीधर मोहोळ यांच्या महापौर काळातील विकास निधीतून शिल्पाची निर्मिती
कोथरुड : कर्वे रस्त्यावरीव हुतात्मा राजगुरु चौक येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या अर्धाकृती शिल्पाचे त्यांचे नातू सत्यशील राजगुरु व हर्षवर्धन राजगुरु यांच्या हस्ते अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी लोकार्पण करण्यात आले.
मुरलीधर मोहोळ यांच्या महापौर काळातील विकास निधीतून हे शिल्प साकारण्यात आले आहे. आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आपण देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या, बलिदान दिलेल्या थोर देश भक्तांच्या आठवणीत साजरा करत आहोत. त्याच अनुषंगाने आज कर्वे रस्त्यावरील हुतात्मा राजगुरू यांच्या अर्धाकृती शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले आहे. हुतात्मा राजगुरू यांनी देशासाठी केलेल्या महान कार्याच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.
या प्रसंगी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेविका हर्षाली माथवड वासंती जाधव, निलेश कोंढाळकर, अंबादास अष्टेकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते. झाला सोसायटीमधील त्रिदल मित्र मंडळाने या शिल्पाचे कायमस्वरूपी देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आहे.

हुतात्मा राजगुरु यांच्या त्यागाची, समर्पणाची आणि देशभक्तीची प्रेरणा नक्कीच आताच्या पिढीला या शिल्पातून मिळत राहील, हा विश्वास वाटतो असे मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले.






