पुणे शहर

वारजेतील अमोल घोडके यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान…

मुंबई : कोविड -19 महामारीच्या कठीण काळात अनेक लोकांनी कोविड योद्धा म्हणून विविध प्रकारे देशाची सेवा केली आहे. त्यात अनेक डॉक्टर, सफाई कामगार, मानवतावादी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होते. वारजे येथील अभिनेता, निर्माता अमोल घोडके यांनी अशाच प्रकारे कोरोना काळात लोकांची मदत केल्याने त्यांचा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Img 20211014 wa0004

दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कोविड योद्ध्यांचा सन्मान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात कौतुक चिन्ह देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात अमोल घोडके यांना कोविड योद्धा म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते समाजासाठी त्यांच्या निःस्वार्थ योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Fb img 1634273561468
Img 20211015 wa0025

पुरस्कार स्वरूप त्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र आणि रुपये 50,000/- रूपये रक्कम प्रदान करण्यात आली.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अमोल घोडके यांच्या कार्याचे कौतुक करून  त्यांना समाजासाठी असेच काम करत राहण्यासाठी प्रेरणा दिली. 

Img 20211015 wa0029
Fb img 1634272588358

याप्रसंगी बोलताना राज्यपाल म्हणाले की अमोल घोडके आणि त्यांच्यासारख्या लोकांमुळे कोव्हीड काळात असंख्य लोकांसाठी अडचणीच्या काळात बऱ्याच गोष्टी सुलभ झाल्या. यावेळी अभिनेत्री दिपाली सय्यद ह्यांनी देखील अमोलच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Img 20211015 wa0006
Img 20211015 wa0020
Img 20211015 wa0012

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अमोल घोडके म्हणाले की, “मला मिळालेल्या प्रेम आणि कौतुकाबद्दल मी खरोखरच सर्वांचा खूप आभारी आहे. यापुढे देखील समाजासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी अधिकाधिक समाजोपयोगी काम भविष्यात करण्याचा माझा प्रयत्न असेल तसेच पुरस्कार रूपाने मिळालेले हे 50,000/- रुपये देखील सामाजिक कार्यासाठी वापरणार आहे. 

Img 20211015 wa0010

या कार्यक्रमात के.ई.एम रुग्णालयाचे डॉ.हेमंत देशमुख, नायर रुग्णालयाचे डॉ.रमेश भारमल, कूपर रुग्णालयाचे डॉ.शैलेश मोहिते, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले तसेच आणखी काही मान्यवरांचा देखील गौरव करण्यात आला.

Fb img 1634232722076
Img 20211015 wa0007
Img 20211015 wa0365
Img 20211015 wa0002
Img 20211015 wa0005
Img 20211014 wa0023

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये