कोथरुड

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान व स्वच्छ भारत अभियानास सुरवात     

कोथरुड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन कार्यालय व पुणे मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने  प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण परिसरातील कर्वे पुतळा चौक येथे रांगोळी काढून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे निमित्ताने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान व स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२१ संदर्भात नागरिकांना संदेश देण्यात आला.

यावेळी वरिष्ठ मोटार वाहन निरिक्षक संपत खोमणे, पुणे ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, असोसिएशनचे किरण इंगळे, पल्लवी इंगळे, जलसंपदा विभागाचे विलास घुले, पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाचे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे, आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, नवनाथ मोकाशी, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरेआदी उपस्थित होते.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे नागरिकांना आवाहन करताना म्हणाले “आज संपूर्ण देशात लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्या  वाढली आहे. रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याने नागरिकांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहेत. तसेच वाढत्या प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. म्हणून नागरिकांनी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करत परिवहन विभागाच्या नियमांचे पालन करावे,  वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये, दारू पिऊन वाहन चालवू नये.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

कोथरूड भागातील आरोग्य विभागाचे मोकादम वैजीनाथ गायकवाड प्रबोधन करताना म्हणाले की,  राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान व स्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती लोकाभिमुख झाली पाहिजे. महानगरपालिकेच्या स्वच्छतेचे व परिवहन विभागाचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर जनजागृती बरोबर दंडात्मक कारवाई देखील होणे अपेक्षित आहे. नागरिकांनी पान तंबाखू व गुटखा खाऊन सिग्नलला वाहन थांबवून रस्त्यावर थुंकू नये, कचऱ्याचे वर्गीकरण करावे, आपला रस्ता स्वच्छ ठेवावा असे आवाहन त्यांनी केले”.

Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये