महाराष्ट्र

पोलीस मेगा भरतीमध्ये मराठा समाजाला स्थान द्या

मुंबई : पोलिसांच्या मेगा भरतीमध्ये मराठा आरक्षणामधील (SEBC) १३ टक्के प्रमाणे जागा वगळण्यात याव्यात व  या जागा मराठा समाजाला मिळण्यासाठी तामिळनाडू सरकारप्रमाणे राज्य मंत्री मंडळाची मंजुरी घेऊन सर्वोच्च न्यायालयाची मान्यता घ्यावी. आणि मराठा समाजातील मुला मुलींवर होणार अन्याय दूर करावा. अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

मेटे यांनी देशमुख यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली असून आपल्या मागणीचे निवेदन त्यांना दिले आहे. मराठा समाजाच्या मुलामुलींना पोलीस भरतीमध्ये कायद्याच्या चौकटीत बसवून देण्यात यावे अशी विनंती त्यांनी यावेळी देशमुख यांच्याकडे केली आहे.

या बैठकीत गृहमंत्री देशमुख यांनी सकारात्मकरित्या आश्वासन दिलेले आहे. ‘मुख्यमंत्री आणि कायदेतज्ञांशी माझी चर्चा सुरु आहे. लवकरच या संदर्भामध्ये आदेश काढण्याचा माझा प्रयत्न राहील’, असे स्पष्ट आश्वासन आमदार विनायकराव मेटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये