समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी झटणारे चंद्रकांतदादा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान..

काय आहेत कार्यकर्त्यांच्या मनात दादांबद्दलच्या भावना
पुणे : pune city उत्तम संघटन कौशल्य, समर्पित भावनेने काम करण्याची वृत्ती आणि समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळ असणारा नेता चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोथरुड मतदार संघाला आमदार म्हणून मिळाला आणि कोथरूडच्या राजकीय, सामाजिक जीवनाला वेगळे वळण मिळाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कायकर्ता ते आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे आमदार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. Chandrakant Dada Patil in the minds of activists
एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मनात जनसेवेची प्रखर इच्छा ठेऊन नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत याला सर्वप्रथम प्राधान्य दिले. सत्तेत असताना मंत्री म्हणून काम करताना त्यांनी जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय असू द्या किंवा आता विरोधी बाकावर बसून जनतेच्या हितासाठी सरकारला धारेवर धरणे असू द्या चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भूमिका प्रत्येक वेळेस सरस ठरली.
राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली. कार्यकर्त्यांचे उत्तम संघटन निर्माण केले. अडचणीच्या काळात ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कोथरुड मधील कार्यकर्त्यांनी त्यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी प्रयत्न करणारे दादा: निलेश कोंढाळकर (कोथरूड मंडल अध्यक्ष)
जनसेवेचे व्रत घेतलेले नेतृत्व म्हणजे चंद्रकांतदादा पाटील. कठीण काळात कस काम करायचं हे दादांनी कोरोनाच्या परिस्थितीत कार्यकर्त्यांना दाखवून दिले. मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी त्यांचे कायम प्रयत्न सुरू असतात. केवळ राजकारण न करता जनतेच्या कामाला प्राधान्य देण्याची शिकवण दादांकडून कायम कार्यकर्त्यांना मिळत असते. नागरी प्रश्नांची जाण असल्याने महापालिकेत वारंवार बैठका घेऊन कोथरुड मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. मुलींच्या शिक्षणासाठी, महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध उपक्रम दादा राबवत असतात. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार त्यांच्याकडून केला जातो. जनतेच्या कामाला सर्वप्रथम प्राधान्य देणाऱ्या दादांना जन्मदिनाच्या शुभेच्छा !

समाजासाठी पूर्णवेळ वाहून घेतलेला एकमेव नेता म्हणजे चंद्रकांत दादा : दीपक पोटे (माजी नगरसेवक)
दादांची समाजासाठी काम करण्याची असणारी ऊर्जा कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आलेली आहे. समाजासाठी पूर्णवेळ वाहून घेतलेला एकमेव नेता म्हणजे दादा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. समाज म्हणजे माझं कुटुंब अशा भावना मनात ठेऊनच ते काम करत असतात म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढे असतात. कोथरूडच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अशा प्रेरणादायी आदरणीय दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जनतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे दादा : किरण दगडेपाटील ( माजी नगरसेवक)
दादांनी आपल्या प्रभावी नेतृत्वाने पक्षनिष्ठा, समाजसेवा आणि लोकोपयोगी कार्यांना नवी उंची मिळवून दिली आहे.
दादा आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. त्यांच्या सहवासात आणि आपल्या मार्गदर्शनाखाली नेहमी नवनवीन शिकायला मिळते, स्वतःला घडवायला मिळते आणि समाजासाठी काहीतरी करण्याची खरी प्रेरणा मिळते. त्यांच्या मितभाषी स्वभाव गुणांमुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आपलंसं करून टाकलं आहे. जनतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे दादा खंबीरपणे उभे राहतात. अशा जनसेवेचे व्रत घेतलेल्या दादांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !
समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी काम करणार नेतृत्व म्हणजे दादा : पुनीत जोशी सर्वसामान्यांचे पाठीराखे म्हणून दादांकडे आज पाहिले जाते. समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी दादा प्रयत्नशील आहेत. आज दादा कित्येक गरजूंचे आधार बनले आहेत. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं रहावं, मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं, ज्येष्ठांचे जीवन सुककारक व्हावं, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दादा राबवत असलेले उपक्रम एक नवा समाज घडवत आहे. त्याचं कार्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरत आहे. दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
दादांच्या कार्यातून समाजासाठी काम करण्याची मिळते प्रेरणा.. मंदार बलकवडे (भाजप पुणे शहर उपाध्यक्ष)
कोथरूडकरांचे पालक असणारे दादा संवेदनशील आणि
कार्यतत्पर आहेत. योग्य मार्गदर्शन करूण समाजातील अनेकांची स्वप्न पुर्ण करण्यास त्यांनी हातभार लावला आहे. सर्व स्तरातील नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी ते 24×7 जनसेवेसाठी उपलब्ध असतात. दादांच्या रूपाने एक बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे नेतृत्व कोथरूडला मिळाले आणि कोथरूडच्या विकासाला आणखी गती मिळाली. समाजासाठी वाहून घेणे म्हणजे काय हे दादांकडे पाहून कळते. त्यांच्या कामातून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मिळत असते. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे हा ध्यास त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून दिसून येतो. अशा बहुसंपन्न नेतृत्व असणाऱ्या दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नागरी प्रश्न सोडवण्यावर भर देणारे दादा : सचिन दांगट (अध्यक्ष भाजप सहकार आघाडी पुणे शहर)
दादा म्हणजे एक सहज , साधे व्यक्तीमत्व !!
कोणा छोट्या कार्यकर्त्यालाही सहज ऊपलब्ध होणारे , एखादी गोष्ट आवडली तर जाहीर कौतुक करणारे , संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढताना आपल्या कोथरूडचे आमदार म्हणुन आपल्या कल्पकतेतुन मतदार संघासाठी आगळे वेगळे समाजोपयोगी ऊपक्रम राबवुन कोथरूडकरांचे मनात वेगळे स्थान निर्माण करणारे दादा सर्वांना आपलेसे वाटतात. सामान्य जनतेत मिसळणारे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर असणाऱ्या दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्रकांत दादा म्हणजे संवेदनशील मनाचे नेते विनोद मोहिते (सरचिटणीस भाजप ओबीसी आघाडी पुणे शहर)
चंद्रकांतदादा पाटील कामाचा प्रचंड आवाका असलेला संवेदनशील मनाचा नेते आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना समजून घेऊन त्यांच्या सुख दुःखात कायम पाठीशी खंबीरपणे राहणाऱ्या चंद्रकांत दादांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
माणसे जोडणारा नेता म्हणजे दादा : कुलदीप सावळेकर (कोथरूड मंडल अध्यक्ष )
चंद्रकांतदादा यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेक माणसे जोडली. कार्यकर्त्यांचे उत्तम संघटन निर्माण केले. अडचणीच्या काळात ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मुळातच कार्यकर्ता असलेल्या दादांकडे संघटन बांधणीचे मोठे कौशल्य आहे. संघटनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून सतरंजीवर बसूनच बैठकीत मार्गदर्शन करण्याची दादांची शैली कार्यकर्त्यांना जवळची वाटते. समाजासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या चंद्रकांत दादांना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
चंद्रकांत दादा म्हणजे कार्यकर्त्यांना दूरदृष्टी देणारे नेतृत्व : अमोल डांगे (चिटणीस /कार्यालय सहप्रभरी भाजप पुणे शहर) स्वभावात असलेल्या नम्रतेने दादांशी अनेक लोक, कार्यकर्ते जोडले गेले आहेत. कार्यकर्त्यांना दूरदृष्टी देणारे, योग्य मार्गदर्शन करणारे नेतृत्व म्हणून आम्ही दादांकडे पहातो. समाजकारणात व राजकारणात काम करताना त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर प्राधान्याने भर दिला. समाजाच्या उन्नतीसाठी अनेक योजना ते स्वखर्चाने मतदार संघात राबवत आहेत. मतदार संघाचा विकास होताना समाजाचाही सर्वांगीण विकास झाला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न असतो. समाजाचा प्राधान्याने विचार करणाऱ्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
चंद्रकांत दादा म्हणजे धोरणी नेतृत्व : किरण बारटक्के (माजी नगरसेवक)चंद्रकांत दादा म्हणजे धोरणी नेतृत्व.उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी घेतलेले अनेक शैक्षणिक निर्णय विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. कोथरूड मतदार संघाचा विकास साधत असताना त्यांचे शहराच्या प्रत्येक भागातील प्रश्नांकडे लक्ष असते. आज त्यांची कामाची पद्धत कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरत आहे. द्रष्टा नेता कसा असतो दादांकडे पाहून कळते. अशा धोरणी नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!






