भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्ताने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य आणि अप्रतिम रांगोळी साकारण्यात आली

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्ताने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य आणि अप्रतिम रांगोळी साकारण्यात आली होती. आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी किट चे वाटप करण्यात आले
पुणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस कांचन कुंबरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भारतीय जनता पार्टीच्या ४१ व्या वर्धापनदिना निमित्त माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भव्य पोर्ट्रेट रांगोळी साकारण्यात आली.गणेश खरे या कलाकाराने ही भव्य आणि अप्रतिम रांगोळी साकारली. त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच या कोरोनाच्या उद्रेकावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोबतीने पोलीस कर्मचारी लढत आहेत. आज पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कोथरूड पोलिसांना त्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा कोरोना किटचे वाटप करण्यात आले. या किटचा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी नक्कीच उपयोग होईल. असे कुंबरे यांनी सांगितले.कोरोनाच्या परिस्थितीचे भान ठेवत फक्त आवश्यक व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.



