नवले पुलाजवळ विचित्र अपघात ; ब्रेक फेल झालेल्या कंटेनर ने 35 ते 40 वाहनांना उडवले

पुणे : नवले पुलाजवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने 35 ते 40 वाहने एक मेकांवर आदळत विचित्र अपघात झाला आहे. या घडलेल्या भीषण अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे नवले पुलाजवळील अपघाताचे सत्र कधी थांबणार असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
दरम्यान या विचित्र अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
रविवारी रात्री हा अपघात घडला असून या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर अग्निशामक दल, पीएमआरडीए यांनी बचाव कार्य केले. हा अपघात एवढा भीषण होता की ब्रेक फेल झालेल्या कंटेनर ने धडाधड 35 ते 40 वाहनांना उडवले. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शिंचा हा प्रकार पाहून एकच थरकाप उडाला.
पुण्यातील नवले ब्रिज येथे आज रात्री टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश दिले आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 20, 2022
नवले ब्रीज हा अपघाताचा हॉट स्पॉट आहे. सातत्याने या ठिकाणी अपघात घडत असतात. काल झालेल्या अपघाता प्रमाणे अनेक विचित्र आणि गंभीर अपघात या टप्प्यात घडले आहेत. त्यामुळे येथील अपघाताचे सत्र थांबणार तरी कधी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.







