पुणे शहर

कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय, आरोग्य विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी….!

पुणे : कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक ३८, अंतर्गत संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन- २०२२ अन्वये स्वच्छ सहकारी संस्था, शिवशंभु प्रतिष्ठान व पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विकास मोरे व शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले. यावेळी भारतनगर, दत्तनगर, कात्रज, आंबेगाव परिसरातून स्वच्छता प्रचारफेरी काढण्यात आली. सदर प्रचार फेरीत नागरिकांनी कचरा वर्गीकरण करून महानगरपालिकेच्या घंटागाडीला किंवा स्वच्छ सहकारी संस्थेच्या स्वयंसेवकांना द्यावा, नागरिकांना सार्वजनिक रस्त्यावर थुंकू नये, सार्वजनिक ठिकाणी तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा तसेच ऐतिहासिक कालखंडातील जुना कात्रज बोगदा या नैसर्गिक निसर्गरम्य अशा राष्ट्रीय महामार्गावर कचरा टाकू नये, नदी नाले प्रवाह स्वच्छ ठेवावेत, तसेच सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता व निगा राखण्याची जबाबदारी नागरीकांनी स्वतः अंगीकारवी तसेच स्वच्छ सर्वेक्षण मध्ये पुणे शहराला एक नंबर मिळवण्यासाठी सर्वांनी स्वच्छता अभियानात आठवड्यातून दोन तास सहभागी होऊन स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिकांनी सामील होऊन संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच सार्वजनिक रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांचा गुलाब पुष्प देऊन उपरोधिकपणे सत्कार करण्यात आला व सार्वजनिक रस्त्यावर न थुंकण्यासाठी समज देण्यात आली. सदर कार्यक्रम महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विकास मोरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक सुनिल गोसावी, उमेश ठोंबरे, सचिन बिबवे, मोकादम सोमनाथ गायकवाड, सुनिल चव्हाण, पुजा चव्हाण, महानगरपालिकेचे सर्व आरोग्यरक्षक व शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम व इतर कार्यकर्त्यांनी स्वच्छता प्रचार फेरी आयोजित करण्यास परिश्रम घेतले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45
Img 20220225 wa00038702747946855041624

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये