महाराष्ट्रराजकीय

शिंदेंसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशिरा खलबतं, मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटप ठरलं?

राज्यात राजकीय भूकंपानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाची चर्चा होत आहे. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झाल्याची माहिती समजते. जवळपास एक ते दीड तास ही बैठक सुरू होती. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत चर्चा झाली.

भाजप-शिंदेंच्या सेनेसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता त्यांच्या खातेवाटपाची चर्चा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री केल्याची माहिती समजते. यामध्ये राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना खाते वाटप आणि भाजप, शिवसेनेचा मंत्रीमंडळ विस्तारात समावेश या मुद्दयांवर चर्चा झाल्याचे कळते आहे.

Img 20230707 wa00097391429386569165714

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस रात्री सव्वा अकरा वाजता पोहोचले होते.  उपमुख्यमंत्री अजित पवार १२ वाजता वर्षावर दाखल झाले आणि दीडच्या सुमारास निघाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री २ वाजून १० मिनिटांनी बाहेर पडले. अजित पवार बैठकीला येण्याआधी आणि ते गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाली.

Img 20230708 wa0003

दरम्यान,  उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुन्हा अर्थमंत्रीपद मिळण्याचा अंदाज आहे, तसे स्पष्ट संकेतच राज्य सरकारच्या एका जीआरमधून मिळत आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारच्या उर्जाविभागाचा हा जीआर आहे, ज्यात वित्तमंत्री म्हणून कुणाचेच नाव नाही.

Img 20221228 wa00016208176808646242256
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये