पुणे शहर

पुणे महानगरपालिका तयार करणार ५ हजार सीसीसी बेड्स

पुणे : कोरोनाची एकूण स्थिती पाहता खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेड्सची उपलब्धता आणि भविष्यातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची गरज, लसीकरण मोहिमेला व्यापक रूप देणे, यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सविस्तर आढावा घेतली.Pune Municipal Corporation will build 5000 CCC beds

या बैठकीत पुणे महापालिकेच्यावतीने शहरातील सर्व खासगी रुग्णालयाचे ८० टक्के बेड्स ताब्यात घेतल्यानंतर जवळपास ७००० हजार बेड्स कोविडसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवाय महापालिकेने सीसीसीचे ५ हजार बेड्स तयार करण्याचे नियोजन केले असून पैकी १ हजार २५० बेड्स उपलब्ध झाले आहेत. शिवाय १ हजार ४५० बेड्सची तयारी सुरु आहे.

Img 20210319 wa0097

मोहोळ म्हणाले, डॅश बोर्ड अद्ययावत ठेवणे आणि गरजूंना कमीत कमी वेळेत बेड उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत. शिवाय लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून व्यापकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत सूचना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये