पुणे शहर

पथविक्रेता एकता समितीचा सिद्धार्थ शिरोळे यांना पाठिंबाः अध्यक्ष दीपक मोहिते यांची घोषणा

पुणे : पथारी व्यावसायिकांच्या महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढून त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी नव्हे तर सोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्या सिद्धार्थ शिरोळे यांना या विधानसभा निवडणुकीत आम्ही स्वखुशीने पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा छत्रपती शिवाजीनगर पथविक्रेता एकता समितीचे अध्यक्ष दीपक मोहिते यांनी केली. शिरोळे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेत मोहिते यांनी समितीच्या वतीने शिरोळे यांना आपला संपूर्ण पाठींबा जाहीर केला आहे.

या छोटेखानी समारंभात भूमिका मांडताना समितीचे अध्यक्ष मोहिते म्हणाले की, पथविक्रेता समितीचे पाच हजारांहून अधिक सभासद आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात कमला नेहरू उद्यानालगतची खाऊ गल्ली, झेड ब्रीजजवळ नटराज खाऊ गल्ली, संभाजी उद्यानालगतची खाऊ गल्ली येथे खाद्यपदार्थ विक्री केली जाते. हे फूड झोन आहेत. असे झोन असलेल्या ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर कारवाई करण्यास कायद्याने मनाई आहे. असे असतानाही महापालिका ही कारवाई करते. राष्ट्रीय पथविक्रेता धोरणानुसार सर्वेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांचे सर्वार्थाने पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असते. परंतु महापालिका पुनर्वसन तर करतच नाही उलट अशी बेकायदा कारवाई आणि दंडेलशाही करते. हा प्रश्न सिद्धार्थ शिरोळे यांनी सोडवला. त्यामुळे आता किमान सर्वेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांवरील कारवाई होत नाही. यामुळेच पक्ष न पाहता उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही शिरोळे यांना पाठिंबा देत आहोत.

Img 20241020 wa0001435697684176070576

यावेळी समितीचे उपाध्यक्ष सुनील भादेकर, समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी निवडणुकीसाठी पाठिंबा आणि समर्थनाचे औपचारिक पत्र शिरोळे यांना सुपूर्द केले. यावेळी प्रचारप्रमुख दत्ता खाडे, अपूर्व खाडे, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेचे अधिकारी अचानक येऊन सिलिंडरवर कारवाई करतात, सिलिंडर उचलून घेऊन जातात. अगदी गर्दीच्या वेळेस धंदा बुडतो आणि मोठे नुकसान होते. सिद्धार्थ शिरोळे यांनी हस्तक्षेपामुळे परिस्थिती बदलली आहे. अशा अचानक कारवाईची चिंता दूर झाली असल्याचेही मोहिते म्हणाले.

Img 20240404 wa0016281297658999536660438617

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने सिद्धार्थ शिरोळे सध्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी पदयात्रा काढत नागरिकांच्या भेटीगाठी सुरु आहेत. आजही खिलारेवाडी म्हसोबा मंदिर, प्रभात रस्ता, डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डेक्कन बसस्थानक, कमला नेहरू पार्क, भांडारकर रस्ता, आपटे रस्ता, घोले रस्ता, पुलाची वाडी या भागांत पदयात्रा काढत नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या.

Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये