कोरोना संकट असताना वारीवरून राजकारण करणाऱ्या भाजपच्या तुषार भोसलेंच्या भोंदूपणाचा बुरखा आम्ही लवकरच फाडू : राष्ट्रवादीचे विजय डाकले यांचा इशारा

पुणे : वारी हा भावनिक विषय आहे, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका आपण नुकताच अनुभवला आहे. वारकरी आणि वारीत लाखोंच्या संख्येने सामील होणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या आरोग्याच्या सुरक्षेची काळजी घेऊन वारीबाबत महाराष्ट्र शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. पण वारीच्या नावावर राजकारण करून समाजात द्वेष पसरवणाऱ्या भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या भोंदुपणाचा बुरखा आम्ही लवकरच फाडू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहराध्यक्ष विजय डाकले यांनी दिला आहे. It is wrong to do politics from Wari;
डाकले यांनी म्हंटले आहे की, गेले काही दिवस ज्याचे स्वतःचे काही कर्तृत्व नाही ,ज्याचा वारकरी संप्रदायाशी काडीचा संबंध नसलेला भाजपचा तुषार भोसले नामक व्यक्ती पायी वारी व्हावी यासाठी समाजात द्वेष पसरवत आहे. पिढ्यानपिढ्या ज्यांनी पायी वारी केली अशा व्यक्तींना पण कोरोनाचे गांभीर्य कळले आहे. कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा धोका पुढे असताना सध्या जे वारी वरून राजकारण करत आहेत त्यांना खरच वारकऱ्यांच्या व विठ्ठल भक्तांच्या आरोग्याची काळजी आहे का असा प्रश्न पडत आहे.

ज्या संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचा कळस चढवला असे म्हणतात ते कधी पंढरपूर ला गेले नाहीत आपल्या भक्तीने त्यांनी साक्षात विठ्ठलाला देहूत आणले. अशा थोर संताचा वारसा महाराष्ट्र राज्याला आहे. मान्य आहे वारी हा भावनिक विषय आहे मात्र कोरोनाच्या काळात त्यावरून राजकारण करणे किती योग्य आहे .
काही मंडळी फक्त राजकारण करण्यासाठी पुढे येत आहेत. यांचे बोलावते धनी कोण आहेत हे पूर्ण महाराष्ट्र राज्याला माहीत आहे. आळंदीमध्ये पण ग्रामस्थांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. दुसरी लाट येण्यापूर्वी लॉकडाऊन ला विरोध करणारे विरोधी पक्षाचे नेते कोरोना वाढत असताना बाहेर आले नाहीत. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असताना पण फक्त राजकारण करत पुढे येणारा तुषार भोसले हा व्यक्ती भोंदू असून त्याचा बुरखा आम्ही लवकरच फाडु असा सज्जड इशारा डाकले यांच्याकडून देण्यात आला आहे.


