पुणे शहर

पुणे महापालिकेचा चक्क हिंदीमध्ये सूचना फलक मनसैनिकांनी काळे फासले. कर्वेनगर मधील प्रकार…

पुणे :  कोथरूड मधील कर्वेनगर चौकातील कै. नानासाहेब बराटे उड्डाणपूलाला सुशोभीकरणाच्या नावाखाली हिंदी भाषेत संदेश लिहिण्यात आले आहेत. एकतर मनपाने हिंदी भाषा कामकाजात अधिकृतपणे वापरण्याचा एखादा नवा कायदा केला आहे का.? असा प्रश्न करीत मनसेच्या वतीने या सूचना फलकाला काळे फासण्यात आले.Mansainiks smashed the notice board of Pune Municipal Corporation in Hindi. Types in Karvenagar

आज मनसे कोथरूड विभागाच्या वतीने आंदोलन करत विभाग अध्यक्ष सुधीर धावडे आणि कर्वेनगर येथील स्थानिक महाराष्ट्र सैनिक संतोष वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलाला काळे फासून ह्याचा निषेध करण्यात आला.

Img 20210223 wa0156

धावडे म्हणाले, हळू हळू हिंदी भाषा किंवा इतर कोणतीही परप्रांतीय भाषा पुणेकरांच्या माथी मारून ती मनावर बिंबवण्याचा काही कावा सत्ताधाऱ्यांनी आखला आहे असा प्रश्न पडतो. एक तर हिंदी त्यात अशुद्धहिंदी..! परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कधीही सहन करणार नाही.. पुणेकरांवर जबरदस्तीने लादलेल्या हिंदी भाषेचा आम्ही जाहीर विरोध करतो व निषेधही करतो. “महाराष्ट्रात आणि त्यात पुण्यात तर फक्त मराठीच” हा मराठी भाषेच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. ह्यामध्ये राजसाहेबांच्या आदेशाने मनसे खंबीरपणे मराठी माणसाच्या व मराठी भाषेच्या बाजूनेच उभी असेल.
   

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये