पुणे शहरात लॉकडाऊन नाही. पण निर्बंध अधिक कठोर करणार : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पुण्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील निर्बंध अधिक कठोर करण्यात येणार आहेत. हॉटेल , रेस्टोरंट्सच्या वेळा, बागा, स्विमिंग पूल तसेच जिमच्या वेळांवर बंधनं आणली जाण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारी पालकमंत्र्याच्या उपस्थितीत आढावा बैठक होईल. त्यात याबाबतचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.There is no lock down in Pune city. But restrictions will be tightened: Mayor Muralidhar Mohol

पुण्यात मंगळवारी एक हजाराच्या वर रुग्ण आढळून आले. त्याचप्रमाणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजारांवर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याबाबतीत पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी, महापौर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये येत्या शुक्रवारी बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येणार आहे.
मोहोळ म्हणाले, पुणे शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र यावर लगेच लॉक डाऊन हा पर्याय नाही. मात्र रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी काही कडक निर्बंध लादले जाऊ शकतात. नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.






