पुणे शहर

मोरया मित्र मंडळातर्फे छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी ; विविध स्पर्धा व पुरस्कारांचे वितरण

कर्वेनगर : कर्वेनगर मधील मोरया मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विविध स्पर्धांचे आयोजन ही या निमित्ताने करण्यात आले होते.

छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे ह.भ.प रोहिणी ताई परांजपे आणि भारतीय इतिहास संशोधक मंडळ सदस्य मंगेश नवघणे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले तर खारवडे गावाचे सरपंच लक्ष्मण मारणे व संभाजी गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी ह.भ.प रोहिणी ताई परांजपे यांचे छत्रपती संभाजी महाराज ह्या विषयावर नारदीय किर्तन व व्याख्यान झाले. मोरया मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी संभाजी महाराज जयंती निमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात.

यावर्षी मोरया जीवन गौरव पुरस्काराने जेष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली संघटना पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाला मोरया भूषण पुरस्कार, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विश्व शक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख डॉ.दत्ता कोहिनकर यांना मोरया रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला मोर्चा, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे राजु पलमाटे या़ंचा कर्तव्य दक्ष कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला.


Img 20220425 wa0010282295345156635031542582

याप्रसंगी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा,आयोजित करण्यात आल्या होत्या ह्या स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा मधुराताई भेलके, कोथरूड काँग्रेस अध्यक्ष विजय खळदकर यांच्या हस्ते करण्यात आला.


वत्कृत्व स्पर्धा
ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धा १४ वर्षांखालील गटात कोल्हापूर जिल्ह्यातील विश्ववेदा विलास सावंत हिला प्रथम, अहमदनगर येथील सोहम वाघस्कर द्वितीय तर उत्तर सोलापूर मधील सायली गायकवाड हिला तृतीय क्रमांक मिळाला
खुला गट
योगेन राजेंद्र सावंत (मुंबई) प्रथम, वैष्णवी शहाजी पवार (इंदापूर)द्वितीय, रोहिणी कोठावदे (मुंबई) तृतीय
उत्तेजनार्थ पारितोषिक
तनिष्का पांडुरंग ढवाण(बारामती), प्रतिक शिंदे, प्रणिती पवार(सांगली), ईशा बोराटे, दिव्या साबळे (शिरुर), अवनीश जाधव यांना देण्यात आले

राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा
खुला गट,
रुपाली कापडेकर हिरवे( जुन्नर) हिने प्रथम क्रमांक तर दिवाकर बडगुजर (जळगाव)द्वितीय, प्रीती गजानन भोज(पुणे) तृतीय क्रमंक मिळवला.

१४ वर्षांखालील गट
प्रथम क्रमांक स्मृतीका पांडुरंग ढवाण (बारामती),द्वितीय क्रमांक लावण्या सचिन ठाकर ,तृतीय क्रमांक पुर्वा शिंदे
उत्तेजनार्थ
अवनीश जाधव ,यश शितल बनसोडे ,मानसी सुरेश पगारे,अस्मिता मेढे, नेहा माळी,

भव्य चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक नेत्रा नवनाथ नायकवडी, द्वितीय क्रमांक सार्थक दर्शन गायकवाड, तृतीय क्रमांक संचिता काळे ,

भव्य चित्रकला स्पर्धा उत्तेजनार्थ ,
अवनीश प्रविण मराठे, निलय खेडेकर

Img 20230511 wa00027384472977045778543

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर यांनी केले तर आयोजन मंडळाचे संस्थापक केदार मारणे यांनी केले होते याप्रसंगी बोलताना मारणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची पिढी घडविण्यासाठी आम्ही व्याख्यान, स्पर्धाचे आयोजन करत आहोत. छत्रपतींचे विचार घराघरापर्यंत पोहचवण्याचे मंडळाने ठरवले आहे. तेच ध्येय ठेवून काम केले जात आहे.

यावेळी उस्तव प्रमुख रोहिदास जाधव, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, उपाध्यक्ष रोहन पायगुडे, जगदिश दिघे, आनंद तांबे, खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हर्षल मारणे, राहुल मारणे, अक्षय मारणे, गिरीश भागवत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शिंदे, विनायक उभे, धनंजय साबळे, स्वाती दारवटकर, पौर्णिमा केसवड, सुरेखा जोशी, रेणुका जावळे, अक्षय केसवड, परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन अध्यक्ष गणेश गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये