पुणे शहर

वारजे माळवाडी पॉप्युलर नगर प्रभागातील वातावरण फिरले.मनसे निष्ठावंतांसाठी राज ठाकरे उदया वारजे माळवाडीत 

उद्या सकाळी राज ठाकरे वारजे माळवाडीत उमेदवारांशी संवाद साधून घेणार आढावा…

पुणे : वारजे पॉप्युलरनगर प्रभाग क्रमांक 32 मधील राजकीय वातावरण तापले असून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी या प्रभागात प्रचारात आघाडी घेतली असून lआपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरे स्वतः वारजे भागात येणार असून त्यांच्या भेटीने वारजे भागातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा आहे. वारजे माळवाडी परिसरातील स्थानिक प्रश्नांवर भाग्यश्री दांगट यांनी घेतलेल्या भूमिकेला नागरिक मोठ्या प्रमाणात साथ देताना दिसत आहे. त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

पुणे महापालिका निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलर नगर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे उदया सकाळी 11 वाजता वारजे माळवाडी चौकातील कैलास दांगट यांच्या संपर्क कार्यालयात येणार असून यावेळी ते उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत

प्रभाग क्रमांक 32 वारजे माळवाडी पॉप्युलर नगर प्रभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार भाग्यश्री कैलास दांगट, केशर प्रवीण सोनवणे, गणेश धुमाळ, रियाज शेख या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे वारजे माळवाडी परिसरात मंगळवारी सकाळी 11 वाजता येणार आहेत.

Img 20251125 wa01782121520512185783132

यावेळी बोलताना मनसे नेते कैलास दांगट म्हणाले, वारजे माळवाडी पॉप्युलर प्रभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या ठिकाणी उद्या आमचे नेते राज ठाकरे या भागातील उमेदवार, कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये