पुणे शहर

पंतप्रधान आवास योजनेच्या २ हजार ९१९ घरकुलांची ऑनलाईन पद्धतीने सोडत

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाच प्रकल्पांसाठीच्या २ हजार ९१९ घरकुलांची सोडत ऑनलाईन पद्धतीने सोडत केंद्रीयमंत्री  प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. पुणे महापालिकेने या योजनेला चांगली गती दिली असल्याचे सांगत प्रधानमंत्री आवास योजनेला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे यावेळी जावडेकर यांनी सांगितले.

Img 20201024 wa0167
Advertisement

महापालिकेच्या नव्या इमारतीत छत्रपती श्री.शिवाजी महाराज सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (ऑनलाईन), विधान परिषद उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे (ऑनलाईन), भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, खासदार  गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते  धीरज घाटे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, महाराष्ट्रात अनेक महानगरपालिकेच्या अंतर्गत गरिबांना परवडणारे घरांची योजना वेगवेगळ्या टप्प्यावरती सुरू आहे. पुणे महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे, जिथे प्रधानमंत्री आवास योजनेला चांगली गती देत एकूण २९१९ घराची सोडत केली, याचा मला विशेष आनंद आहे.

पुणे महानगरपालिका, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मदतीने भविष्यात १ लाख २५ हजार घरे तयार करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे, त्यात महापालिका, पीपीई, बांधकाम व्यावसायिक यांच्या सहकार्यातून उभारणार आहे. महानगरपालिका   गरिबांना परवडणारी ३०० स्के. फुटची घरे देणार आहे, यामध्ये केंद्रसरकार १.५ लाख, राज्यसरकार १ लाख तर महापालिका प्रत्येक घरासाठी लागणार्‍या ३ ते ४ लाख रुपयांची जमिनीच्या किंमतीचा वाटा उचलणार आहे.

सद्य परिस्थितीत हडपसर, खराडी, वडगाव या ठिकाणी एकूण ६,२४५ घरांची कामे सुरू केली आहेत. पुढे EWS, SDH च्या माध्यमातुन शहरातील जागा ताब्यात घेणे तसेच राज्यसरकारकडे शहरातील गायरान उपलब्ध करून देण्यात यावीत, यासंदर्भात मागणी केली आहे.

या प्रकल्पासाठी जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०१७ यामध्ये अर्ज मागविण्यात आले होते. यात १ लाख १३ हजार २०० अर्ज प्राप्त झाले होते, त्यामधील ३८ हजार ८१३ अर्ज हे निकषाप्रमाणे पात्र ठरले होते. ६ हजार २४५ घरकुलांपैकी आज पहिल्या टप्प्यात २ हजार ९१९ घरकुलांची ऑनलाईन सोडत आज पार पडली. पुणे महापालिकेतील शहर अभियंता व त्याच्या टीमचे विशेष कौतुक महापौर मोहोळ यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये