आरोग्य

ड्रिल मशीनने काम करत असताना ९ सेमी लांब खिळा घुसला पायातील हाडात आरपार ; पिरंगुट मधील श्रद्धा हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

पिरंगुट : ड्रिल मशीनद्वारे लाकडी बॉक्सला खिळा मारत असताना अनावधानाने तोच खिळा बुट असताना अतिशय वेगाने पायातील टाचेत हाडातून आरपार घुसला आणि रुग्ण असह्य वेदनांनी गंभीर जखमी झाला..

संबधित रुग्णाला आपात्कालीन अवस्थेत पिरंगुट मधील श्रद्धा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. एक्स रे काढल्यानंतर तो खिळा टाचेतील हाडातुन आरपार झाल्याचे दिसून आले. हाडातुन खिळा आरपार झाल्याने शस्त्रक्रिया करून तो काढावा लागणार होता त्यासाठी हर्डीकर हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ.सचिन नागापूरकर यांना बोलावण्यात आले.

Img 20231213 1917143278022059532608762 1

डॉ.सचिन नागापूरकर यांनी भुल देऊन शस्त्रक्रिया करून तो खोलवर पायात टाचेतील हाडातुन आरपार घुसलेला खिळा बाहेर काढला आणि रुग्णाने सुटकेचा निःश्वास सोडला.
हर्डीकर हॉस्पिटल चे अस्थिरोग तज्ञ डॉ.सचिन नागापूरकर यांनी ही शस्त्रक्रिया केली. भुलतज्ञ डॉ.संतोप कुंभार आणि डॉ.सचिन न्याहारकर यांनी त्यांना मदत केली तर श्रद्धा हॉस्पिटलचे डॉ.विलास दुडे यांनी फिजीशियन म्हणून रुग्णाला तपासले.

अशा पद्धतीने जर एका साधारणपणे ४.५ मिमी.जाडीचा आणि ९ सेमी लांबीचा खिळा ज्यावेळी शरिरात मध्ये घुसतो, तेव्हा शरिरातील नसा, स्नायू, रक्तवाहिन्या यांना गंभीर इजा होते. अशा रुग्णाला तात्काळ वैद्यकीय उपचार न मिळाल्यास अवयव निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारची जोखमीची कामे करताना विशेष काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन डॉ.सचिन नागापूरकर यांनी केले आहे.

Img 20231214 1524576172059706679533196
Img 20231111 wa0004281292791598778819580777
Img 20230717 wa0012281294586790481769091554
Img 20230511 wa0002282292722773256594657904

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये