उद्योजकांसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान ब्रह्मद्योग २०२३ प्रदर्शन..

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने, भारतातील उद्योजकांसाठी व स्टार्टअप व्यवसायिकांसाठी ब्रह्मद्योग 2023 हे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. दिल्ली येथे दिनांक 25फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन पार पडणार आहे.
ब्राह्मण संघटनेने आयोजित केलेला देशपातळीवर सर्वात मोठा कार्यक्रम असणार आहे. देशभरातील 20 राज्यातील प्रतिनिधी, पदाधिकारी, उद्योजक, व्यावसायिक उपस्थित या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली, देशपातळीवर होणाऱ्या भव्य अशा या कार्यक्रमाला,अनेक राजकीय नेते,खासदार, आमदार, प्रतिष्ठित न्यायाधीश, ख्यातनाम वकील, प्रतिष्ठित डॉक्टर्स व देशभरातून येणारे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.
▪️25 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी – Industrial Exhibition, constitution club,दिल्ली
▪️उद्योजक चर्चासत्र – हॉटेल अशोका , दिल्ली
▪️27 फेब्रुवारी सकाळी वकिलांचे संमेलन व चर्चासत्र – हॉटेल अशोका , दिल्ली
▪️27 फेब्रुवारी संध्याकाळी – पदाधिकारी संमेलन, तालकटोरा स्टेडियम, दिल्ली
▪️28 फेब्रुवारी – डॉक्टर्स संमेलन, चर्चासत्र, हॉटेल अशोका , दिल्ली




