साईनाथ क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेत हमराज मृत्युंजय संघ विजयी

पुणे : साईनाथ क्रिकेट क्लब आयोजित भव्य फुल पीच क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या असून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्व.विलासभाऊ मोहोळ यांच्या स्मरणार्थ हमराज मृत्युंजय संघाने पटकावले.द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्व.भारत कदम (आबा) यांच्या स्मरणार्थ साईनाथ क्रिकेट क्लब ने पटकावला.तृतीय क्रमांक स्व.दत्ता भाऊ लोखंडे यांच्या स्मरणार्थ रहीम इलेव्हन संघाने पटकावले.चतुर्थ क्रमांक स्व.उमाजी म्हस्के यांच्या स्मरणार्थ शिव शक्ती क्रिकेट संघ (माण )यांनी पटकावला.
स्व.मंजुळा काकू खाडे यांच्या संरणार्थ 40 वर्षा पुढील विजेता संघ आयडीएल क्रिकेट क्लब(राहुल साठे) मानकरी ठरले.
स्पर्धेतील उत्कृष्ठ गोलंदाज साईनाथ क्रिकेट क्लब चा राजा पवार,उत्कृष्ठ फलंदाज व स्पर्धेचा मानकरी हमराज मृत्युंजय संघाचा दादा गायकवाड़ ठरला. स्पर्धा सचिन पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आल्या होत्या.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न झाला.तसेच बक्षिस सभारंभा साठी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष जगदीश मूळीक,कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी,भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र चिटणीस गणेश वरपे,अरविंद गोरे व संदीप काळे,नगरसेविका श्रद्धा प्रभुणे, नगरसेवक आदित्य माळवे,कैलास भाऊ मोहोळ, भारतीय जनता पार्टी कोथरूड महिला अध्यक्ष हर्षदा फरांदे,भारतीय जनता पार्टी कोथरूड महिला सरचिटणीस गायत्री काळभोर उपस्थित होते.







