पुणे शहर

शासन निर्णयानुसार माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा पत्नी यांना महापालिकेने मालमत्ता करातून सूट द्यावी : दिपाली धुमाळ


पुणे : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार माजी सैनिक माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना तसेच संरक्षण दलातील शौर्यपदक धारकांना  त्यांच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या करातुन सुट देण्यात येते. मात्र पुणे महानगरपालिकेने अद्याप पर्यंत माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा पत्नी यांना मालमत्ता करात सूट दिलेली नसून ती तातडीने देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. Municipal Corporation should exempt ex-servicemen, widows of soldiers from property tax as per government decision: Deepali Dhumal

या संदर्भातील निवेदन धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले असून याबाबतचा ठराव ही त्यांनी स्थायी समितीकडे पाठवला आहे. माजी सैनिक,  सैनिकांच्या विधवा पत्नी, तसेच संरक्षण दलातील शौर्यपदक धारकांना शासन निर्णयानुसार त्यांच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या करातुन सुट देणे आवश्यक आहे. परंतु पुणे महानगर पालिकेने अद्यापपर्यंत अशी कोणतीच सूट दिली नसल्याने पुणे महापालिका एकप्रकारे शासन निर्णयाचे पालन करत नसल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे. 

Img 20210319 wa0097

मिळतकरातुन सुट मिळणेबाबत अनेक माजी सैनिक वेळोवेळी मागणी करत आहेत परंतु अद्याप याबाबत कोणताही निर्णय महानगरपालिकेकडुन झालेला नाही. राज्यातील अनेक महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतमध्ये या शासन निर्णयांची अमलबंजावणी  केली जात असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
        

त्यामुळे माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी,संरक्षण दलातील शौर्यपदक धारक  यांच्या मालकीच्या निवासी मालमत्तेस मालमत्ता करातुन राज्य शासनाच्या संदर्भिय शासन निर्णयाच्या दिनांकापासुन सुट देण्यांत यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये