पुणे शहर

कोविड योद्ध्यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त आधार कार्ड नोंदणी/दुरुस्ती, सुकन्या योजना अशा अनेक योजना राबवल्या गेल्या. यावेळी कोवीड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सभासद सचिन पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सुकन्या योजनेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेविका अल्पाना वरपे, नगरसेवक आदित्य माळवे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, स्वीकृत सदस्य विलास मोहोळ, वैभव मुरकुटे, गणेश वर्पे, वृक्ष प्राधिकरण सदस्य संदीप काळे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, दुष्यंत मोहोळ, प्रभाग अध्यक्ष कैलास मोहोळ, सागर कडू तसेच श्री साईनाथ मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते.

Img 20210522 wa0203

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये