पुणे शहर

प्रबोधन विचारधारा कोथरुडच्या वतीने मधुमेह तपासणी शिबीर व मार्गदर्शन या उपक्रमाचे आयोजन

पुणे : प्रबोधन विचारधारा कोथरुडच्या वतीने जागतिक मधुमेह दिननिमित्त आज १४ नोव्हेंबर रोजी मोफत मधुमेह तपासणी शिबीर व मार्गदर्शन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कोथरूड येथील थोरात उद्यानमध्ये हे शिबीर पार पडले.या शिबीरास नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.महिला व तरुणांची संख्या लक्षणीय होती.

डॉ.सुप्रिया भालेराव,डॉ.रवीना रणदिवे,प्रिया गेहलोत,प्रतिक्षा टोलमरे यांनी मधुमेह तपासणी व त्यावरील उपचार म्हणून करावयाच्या व्यायाम व योगासनांचे प्रकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच नियमित योगासने व नियंत्रित आहार याद्वारे मधुमेह कसा टाळता येईल याबद्दल नागरिकांचे प्रबोधनही केले.

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक व्यक्तींना मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे.विशेषता तरुण वयातच अनेकजन मधुमेहाने त्रस्त आहेत.अशा वेळी पूर्व मधुमेह अवस्थेतील रुग्णांनी वेळेतच व्यायाम व योगोपचाराने मधुमेह नियंत्रित करावा व त्यातून मधुमेह आजाराविषयी समाजप्रबोधन व्हावे या उद्देशाने जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून त्याच दिवशी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक योगेश मोकाटे यांनी यावेळी सांगितले.

Img 20211105 wa0169

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये