कोथरुड

कोथरूडमध्ये वायरमध्ये अडकलेल्या कावळ्याची नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुटका ; अग्निशमन दलाने बजावले कर्तव्य 

कोथरूड : वायरला , पतंगाच्या मांजाला अडकून पक्षी दगावल्याच्या घटना अनेक वेळा घडत असतात. असाच एक प्रकार कोथरूड मधील डी.पी रोड वरील शांतीबन गणपती मंदिर चौकात घडला. झाडामधील वायरला कावळा अडकून बसला होता. सुटकेसाठी आकांत करत होता. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून कावळ्याची सुटका करत त्याला जीवदान दिले. 

डी.पी रस्त्यावर शंतीबन चौकात एका झाडातून गेलेल्या वायरला कावळा अडकून बसला होता. सुटकेसाठी तो तडफड होता आणि जोरात ओरडत होता. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी माजी नगरसेवक राजा गोरडे यांना संपर्क साधला. गोरडे यांनी लगेच ही घटना अग्निशमन दलाला कळवली. 

Img 20230717 wa0012281292712276676815194924

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून वायारला अडकलेल्या कावळ्याची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला. बराच वेळानंतर अग्निशमन दलाला त्याची सुटका करण्यात यश मिळेल. वायर मधून कावळा सुटला आणि त्याने आकाशात भरारी घेतली व उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून अग्निशमन दलाच्या जवानांचे अभिनंदन व कौतुक केले. गोरडे म्हणाले, अग्निशमन दलाचे खरे कौतुक केलं पाहिजे कारण त्यान तत्परतेने येऊन एका पक्ष्याला जीवदान देत आपले कर्तव्य चोख बजावले आहे. 

Img 20231111 wa0004281292791598778819580777
Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये