कोथरुड

शिवसेनेकडून अलंकार पोलीस स्टेशनला सुरक्षा किट

कोथरुड : सध्या कोरोनाच्या संकट काळात पोलीस प्रशासन महत्वाची भूमिका बजावत समाजात जनजागृती करत आहेत. या काळात पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आवश्यक असल्याने हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेच्या वतीने अलंकार पोलीस स्टेशनला हॅण्ड वॉश, हॅण्ड सॅनिटायझर, हॅण्ड ग्लोज, आणि मास्क असे सुरक्षा किट देण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे अजय भुवड, अनिल माझिरे, संताजी खामकर, श्रीकांत कदम, संदीप मराठे, संजय ढापसे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये