पुणे शहर

कोथरूडमध्ये अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून लाडकी बहिण योजनेत 5 हजार महिलांची नावनोंदणी,नावनोंदणी केलेल्या महिला भगिनींचा मेळावा उत्साहात संपन्न..

कोथरुड : कोथरूड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नावनोंदणी अभियान अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आले असून आज सदरील अभियानात नावनोंदणी करणाऱ्या महिला भगिनींचा मेळावा आशिष गार्डन, डी. पी. रोड, कोथरूड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नावनोंदणी अभियानात ५००० महिलांनी नाव नोंदणी केली आहे.

माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले,यावेळी उपस्थित सर्व महिलांशी संवाद साधला आणि येथून पुढेही असेच अनेकविध उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. दरम्यान उपस्थित अनेक महिला भगिनींनी यावेळी माझ्यासोबत सेल्फी देखील घेतला. या महिला मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल समस्त महिला भगिनींचे धन्यवाद.

Fb img 16474137314571819310932637888379
Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये