वारजे साहित्यिक कट्ट्याचे साहित्य चळवळीतील आणखी एक पुढचे पाऊल..

वारजे : वारजे येथील साहित्य कट्ट्यावर आजपर्यंत अनेक साहित्य विषयक विविध कार्यक्रम पार पडले आहेत. या कट्ट्यावर अनेक मान्यवर साहित्यिकांनी उपस्थिती लावत येथे सातत्याने होत असलेल्या कार्यक्रमांचे कौतुक केेले आहे. आता विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या पुढाकारातून सुरू झालेला वारजे साहित्यिक कट्टा हा मराठी साहित्य चळवळ मजबूत करण्यासाठी आणखी पुढचे पाऊल टाकत असून २८ नव्हेंबरला नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन व व्याख्यानमालेला प्रारंभ होणार आहे.
दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नांतून पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समिती आणि वारजे साहित्यिक कट्टा च्या वतीने साहित्यिक स्वर्गीय डॉक्टर रामचंद्र देखणे ग्रंथालय सुरू करण्यात येत असून त्याचे उद्घाटन सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं ५ वाजता प्रसिद्ध बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी बर्वे यांचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मान केला जाणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याबरोबरच शब्दब्रम्ह या चार दिवसीय व्याख्यानमालेचा प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राची लोककला या विषयावर डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांचे व्याख्यान होणार आहे तर २९ नोव्हेंबरला लोकशिक्षक संत गाडगेबाबा या विषयावर वि. दा. पिंगळे हे व्याख्यान देणार आहेत. बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी गांधी आडवा येतो या विषयावर संजय आवटे यांचे व्याख्यान होईल, तर १ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय समाजाची सद्यस्थिती या विषयावर डॉ. प्राचार्य सुधाकर जाधवर यांचे व्याख्यान होणार आहे.
सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते गुरुवार दिनांक १ डिसेंबर २०२२ सायंकाळी सहा वाजता वारजे येथील गंगाबाई धुमाळ बाल उद्यान विरुंगा केंद्र या ठिकाणी ही व्याख्यामला होणार असल्याचे माजी नगरसेवक व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी सांगितले.






