महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्रभाग रचनेनुसार कर्वेनगर होम कॉलनी व वारजे पॉप्युलर प्रभागात हे झाले आहेत बदल..

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आज पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषद घेत नवी प्रभाग रचना जाहीर केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ४० प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग पाच सदस्यीय राहणार असून, एकूण सदस्यसंख्या १६५ असेल. नागरिकांना २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत. यापैकी कात्रज – आंबेगाव प्रभाग हा पाच सदस्यीय असणार आहे.
कर्वेनगर होम कॉलनी जुना प्रभाग क्रमांक ३१ मध्ये बदल दिसत नसून वारजे पॉप्युलरनगर जुना प्रभाग क्रमांक ३२ मध्ये बदल झाला आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार कर्वेनगर, होम कॉलनी हा प्रभाग क्रमांक ३० व वारजे पॉप्युलर नगर हा प्रभाग क्रमांक ३२ असणार आहे.
प्रभाग क्रमांक ३२ वारजे पॉप्युलरनगर ला जुन्या कर्वेनगर होम कॉलनी प्रभागाच्या वारजेतील काही सोसायट्या जोडल्या गेल्या असल्याची चर्चा आहे.
नवीन प्रभाग रचनेमध्ये वारजे पॉप्युलरनगर प्रभाग क्रमांक ३२ मध्ये प्रभागातील महापालिकेतील नवीन समाविष्ट भागातील शिवणे ग्रीन सिटी पर्यंत भाग तसेच दांगट पाटील इंडस्ट्रियल इस्टेट हा भाग जोडण्यात आला आहे.
या महापालिकेच्या निवडणुकीत नवीन प्रभाग रचनेमध्ये महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या शिवणे, उत्तमनगर या भागामुळे वारजे पॉप्युलरनगर प्रभागात मोठे बदल होतील असे वाटत होते. त्यानुसार या प्रभागाला शिवणेचा नवभारत हायस्कूल, ग्रीन सिटी पर्यंतचा भाग जोडला आहे व त्याच्यापुढे पुढे उत्तमनगर व खडकवासला असा मिळून प्रभाग क्रमांक ३३ तयार करण्यात आला आहे.
प्रभाग ३०
https://share.google/sw8bZyKAeL2E0Nepehttps://share.google/sw8bZyKAeL2E0Nepe
प्रभाग ३२
https://share.google/6zMXxKMJgxD8KvV6vhttps://share.google/6zMXxKMJgxD8KvV6v







