पुणे शहर

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.आंबेडकर चौकात ग्रंथोत्सव व व्याख्यानमाला ; स्वप्नील दुधाने यांच्या वतीने आयोजन.

कर्वेनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने  दरवर्षी प्रमाणे ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमालेचे आयोजन  करण्यात आले असल्याची माहिती पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी दिली

दिनांक १२ ते १६ डिसेंबर या कालावधीत वारजे जकात नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर चौक या ठिकाणी हा ग्रंथोत्सव व व्याख्यानमाला होणार आहे.

या ग्रंथोत्सव व व्याख्यानमालेचे उद्घाटन बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. १३ डिसेंबर रोजी शाम भुर्के यांचे मराठी साहित्यातील विनोदी परंपरा, १४ डिसेंबर ला राजन खान यांचे लोक आणि लोकशाही, १५ डिसेंबर ला महाराष्ट्राची संत परंपरा व प्रबोधन, व १६ डिसेंबर रोजी वी. दा. पिंगळे यांचे लोकशिक्षक संत गाडगेबाबा या विषयावरती व्याख्याने होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये