राज्यात ७५ विशेष रोपवाटीकांची निर्मिती होणार

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या हीरक महोत्सवानिमित्त राज्यभरात ७५ विशेष रोपवाटीकांची निर्मिती करण्यात येणार आहे. सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या वृक्ष लागवडी संदर्भातील विविध विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार आहे. शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून सह्याद्री देवराई संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार आहे.यावेळी वनमंत्री संजय राठोड, सह्याद्री देवराईचे अध्यक्ष अभिनेते सयाजी शिंदे आदी उपस्थित होते.
सयाजी शिंदे यांनी या पुर्वीच लागवडीबाबत चळवळ उभी केली आहे. त्यांनी घेतलेले वृक्ष संमेलनाची चांगली चर्चा झाली. लोकांमध्येही आता वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती होऊ लागली आहे. या निमित्ताने शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.



