गेल्या अनेक वर्षांपासून एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली महिला समाजासाठी झटत आहे : आमदार शंकर मांडेकर

बाणेर मध्ये पुनम विशाल विधाते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन
बाणेर : कष्ट केले आणि त्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर त्यासमोर निसर्ग देखील ठेंगा पडतो त्यामुळे एवढा पाऊस असून देखील मोठ्या प्रमाणात महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत . यामधूनच महिलांचे पूनम विधाते यांच्या बद्दलचे प्रेम दिसून येत आहे. पुनम विधाते या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एक सामान्य कुटुंबातील महिला समाजासाठी तसेच महिलांसाठी झटत आहे असे आमदार शंकर मांडेकर म्हणाले. पुनम विशाल विधाते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
आमदार शंकर मांडेकर म्हणाले की गेले अनेक वर्षापासून पूनम विशाल विधाते यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्यामध्ये महिलांसाठी मॅरेथॉन, मंगळागौर स्पर्धा, विविध प्रकारचे प्रशिक्षण शिबिरे अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन पुनम विधाते यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पुनम विधाते यांच्याकडे कोणतेही पद नसताना देखील त्या एखाद्या नगरसेवकासारखे कामे करत आहेत. नागरिकांच्या विविध समस्या घेऊन त्या वेळोवेळी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून कशाप्रकारे या समस्या सोडवता येतील याचा प्रयत्न करत आहे. भविष्य काळामध्ये आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला पुनम विधाते यांना हक्काचा नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वजण मिळून सहकार्य करू. आम्ही सर्वजण पुनम विधाते यांच्या मागे ठामपणे उभे राहू अशी ग्वाही देतो.

पुनम विशाल विधाते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘होम मिनिस्टर’ या मनोरंजक स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. अतिशय आनंददायी वातावरणात ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या स्पर्धेत महिला भगिनींनी आपल्या कलागुण, आत्मविश्वास आणि उत्साहाचा सुंदर मिलाफ सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमादरम्यान विविध आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
अशा उपक्रमांमुळे महिला सक्षमीकरण, समाजातील एकोपा आणि सांघिकतेची भावना अधिक दृढ होत असल्याचा मनस्वी आनंद वाटतो. असे यावेळी पूनम विशाल विधाते म्हणाल्या.



कार्यक्रमाला ‘प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि सोनाली पाटील’, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, मुळशी पंचायत समितीच्या माजी सभापती सारिका मांडेकर, उद्योजिका आरती राव, भाजप नेते राहुल कोकाटे, विशाल गांधिले, पोलीस पाटील अनंत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते बालम तात्या सुतार, कोथरूड कार्याध्यक्ष नितीन कळमकर, ह.भ.प. निवृत्ती कोळेकर, जयेश मुरकुटे , विश्वास कळमकर, बाळासाहेब खैरे, शिवसेना नेत्या ज्योतीताई चांदरे, भाजप नेते प्रवीण शिंदे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष राहुल पारखे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंगेश मुरकुटे, युवा उद्योजक प्रशांत पारखे, युवा उद्योजक शैलेश कदम, पैलवान राजू बालवडकर, बाणेर नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन विजय विधाते, बाणेर नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन रामदास विधाते, भगवान विधाते, राजेश विधाते, तुकाराम विधाते, विठ्ठल विधाते, मधुकर विधाते, माणिक तात्या गांधिले, शेखर सायकर, प्रणव कळमकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर चिटणीस राखी श्रीराव, युवा उद्योजक अंकुश पाडाळे, उपसरपंच अजिंक्य निकाळजे, निहाल सायकर आदी मान्यवर व विधाते कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन क्रांती नाना मळेगावकर यांनी केले.



या स्पर्धेतील पहिल्या १० विजेत्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे..-
१. ज्योती पांडुरंग शिंदे
२. ज्येत्सना दादाराव कांबळे
३. मनोरमा अविनाश नवगिरे
४. शिल्पा गणेश खुमकर
५. प्रीती युवराज ढगे
६. सुनीता वाट धन्नेवाड
७. राधा उत्तम बारहाते
८. गौरी आत्माराम जगदाळे
९. नीलम राजूबा चव्हाण
१०. रेवती अमोल आठवले



