पुणे शहर
अमोल बालवडकर यांची बंडखोरी, कोथरूडमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार… चंद्रकांत पाटील यांना भाजप बंडखोर उमेदवाराचे आव्हान

पुणे : जनतेच्या विरोधात जाऊन उमेदवार दिला तर जनता काय करते हे दाखवणारी ऐतिहासिक निवडणूक होईल. अपक्ष लढून जनतेला न्याय देणार ही स्वाभिमानाची लढाई आहे असे सांगत अमोल बालवडकर यांनी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.
सर्व सामान्य जनता माझ्या पाठीशी असून जनतेमधून येत असलेला प्रतिसाद व कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी बोलणारा व काम करणारा माणूस म्हणून निवडणूक लढवणार आहे. कोथरूड मतदार संघाची सेवा करण्यासाठी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले.मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत जोरदार बांधणी करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.













