पुणे शहर

कोथरूड-शिवतीर्थनगर दुर्घटना : नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई कधी ?

पुणे : कोथरूडमधील शिवतीर्थनगरमध्ये बांधकाम व्यावसायिकाकडून पुनर्विकासासाठी जुनी इमारत पाडताना इमारतीचा काही भाग वर्दळीच्या रस्त्यावर कोसळला. गुरुवारी सायंकाळी हि घटना घडली आहे. सुदैवाने काही लोकांचे जीव या घटनेत वाचले असेल तरी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  निष्काळजी पणे काम करणाऱ्या संबंधित व्यावसायिकावर कडक कारवाई करण्याची मागणी आता  स्थानिक नागरिकांकडून केली जाऊ लागली आहे.

गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शिवतीर्थनगर येथील प्रथमेश या इमारतीचे पाडकाम सुरू होते. मात्र इमारत पाडताना घ्यावयाची काळजी घेतली नसल्याने आणि योग्य पद्धत न वापरल्याने अचानक पणे पूर्ण इमारत एकाच क्षणात कोसळली. यावेळी या इमारतीचा काही भाग वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर कोसळला. यावेळी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दोन महिला सुदैवाने थोडक्यात बचावल्या. इमारतीच्या कडेने लावलेले मोठे पत्रेही रस्त्यावर फेकले गेले. हे पत्रे आणि राडारोडा कोणाच्या अंगावर गेले असते तर मोठा अनर्थ प्रकार घडला असता. केवळ दैव बलवत्तर म्हणून अनेकांचे प्राण वाचले. मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर संबंधितांवर कडक कारवाईची कारवाई होणे गरजेचे आहे.

निष्काळजीपना करीत नागरिकांचा जीव धोक्यात आणणाऱ्या संबंधित बांधकाम व्यावसायिकावर फौजदारी गून्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

महापालिका अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

याबाबतीत बोलताना महापालिकेच्या बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता ईश्वर ढमाले म्हणाले, संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावण्यात येणार असून त्यांच्या बांधकामाला स्थगिती देण्यात येणार आहे. शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे हे प्रकरण पाठवले आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682
Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये