पुणे शहर

चंद्रकांतदादांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब;ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली

पुणे : २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, सर्वोच्च न्यायालयाने ही ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे.

२०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माननीय चंद्रकांत पाटील यांनी निर्विवाद विजय मिळवला होता. या निवडणुकीतील निकालाला ॲड. किशोर शिंदे यांनी माननीय उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने ॲड शिंदे यांची याचिका फेटाळून लावत, माननीय चंद्रकांत पाटील यांचा विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

Img 20220924 182515 453

त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निकालाला ॲड. शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत, याचिका दाखल होती. माननीय सर्वोच्च न्यायालयानेही ॲड शिंदे यांची याचिका फेटाळून लावत, मा. चंद्रकांत पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वत्र स्वागत करण्यात आले असून, विजय सत्याचाच झाला असल्याचे मत, व्यक्त होत आहे.

Img 20220910 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये