पुणे शहर

पुणे बार असोसिएशनतर्फे नव्याने रूजू झालेल्या न्यायाधीशांचा सन्मान

पुणे : पुणे जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर येथे पुणे बार असोसिएशन तर्फे नव्याने रुजू झालेल्या न्यायाधीशांचा सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधिश संजयजी देशमुख व पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते न्यायाधीशांचा सन्मान करण्यात आला.

ॲड.थोरवे यांनी  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी श्री. एस जे भरुका, श्री. ए. टी. वानखेडे, श्री. ए. एस. वाघमारे, श्री. जी. ए . रामटेके, श्री. एस एस गुल्हाणे, श्री. डी पी रागीट, श्री. जे जी डोरले, श्री. ए ए अयाचित,श्री. पेरमपल्ली, श्री. जी पी शिरसाट, श्री. आर इन हिवसे, श्री. के एन शिंदे, श्री. आर जे तांबे, श्री. ए ए घनिवाले, श्री. ए ए पाच्छे, श्री. एस जे शेंडे, श्री. एस ए बजाज, श्री डी टी वसवे, श्री. एस आर नरवडे, श्रीमती ए एस भाटीया, श्री. एस जे भट्टाचार्य, श्रीमती. पी बी येर्लेकर, श्रीमती पी व्ही राणे, श्री एस एस शिंदे, श्रीमती एस व्ही फुलबंदे, श्री. व्ही एन मानखैर, श्री. के ऐन जयसिंघनी, श्री. वाय एल मेश्राम, श्री. एम पी शिंदे, श्री. ए एस अलेवार, श्रीमती. टी एम एहमद, श्री. पी जी तापडिया, श्रीमती आर व्ही डफरे, श्री. एस जी बरडे, श्री. जे एम चौहान, श्रीमती. टी  एस गायगोले, श्री. सी पी शेळके, श्री. एस एच वानखेडे, श्री. व्ही पी खंदारे, श्रीमती. जैन अक्षी या न्यायाधीशांचा सन्मान करण्यात आला.

Img 20220611 wa00023929857787733205553

याप्रसंगी  प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी सर्व न्यायाधीशांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास तसेच पुणे बार असोसिएशन ची कार्यकारिणी तसेच मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पुणे बार असोसिएशन चे कार्यकारिणी सदस्य ऍड रितेश पाटील यांनी केले.   व आभार कार्यकारिणी सदस्य ऍड. तेजस दंडगव्हाळ यांनी मानले. 

सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष – उपाध्यक्ष  ॲड. विवेक भरगुडे, ऍड. उपाध्यक्ष- लक्ष्मण येळे पाटील सेक्रेटरी ऍड. अमोल शितोळे सेक्रेटरी – ॲड. सुरेखा भोसले, खजिनदार ऍड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस- ॲड.शिल्पा कदम कार्यकारिणी सदस्य – ऍड. काजल कवडे, ऍड. सई देशमुख, ॲड.अर्चिता जोशी,  ॲड. अमोल दुरकर, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. अजय नवले व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते                            
               

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये