कोथरूडमध्ये हर्षवर्धन मानकर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना केले करिअर विषयक मार्गदर्शन
कोथरूड: राष्ट्रवादी पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार संसदरत्न सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक ११ मधील १०, १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माजी उपमहापौर दीपकभाऊ मानकर यांच्या हस्ते पार पडला
राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन पुण्याई हॉल येथे करण्यात आले होते. प्रभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या ४५० विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना विवेक वेलणकर यांनी पुढील करिअरसाठी मार्गदर्शन केले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी वेलणकर यांच्याशी संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन केले.
यावेळी निलेश शिंदे, नवनाथ खिलारे, कांताताई खिलारे, कानडे काका, भूषण शिर्के आणि दिवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



















