अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; ईडीकडून दोन स्वीय सहायक्कांना अटक

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहायक्कांना ईडीने शनिवारी मध्यरात्री अटक केली आहे. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे अशी अटक केल्याल्यांची नावे आहेत. मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. Anil Deshmukh’s difficulty increases
देशमुख यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर त्यांना आपल्या गृहमंत्री पदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे. ईडी ने काल देशमुख यांच्या घरावर ही छापा टाक ला त्यावेळी घरी असलेल्या देशमुख यांच्या मुलाची कसून चौकशी केली.
स्वीय सहायक्कांना अटक करण्यात आल्यानंतर देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना बार मालकांकडून ४ कोटी रुपये गोळा केले व ते देशमुखांना दिले असा आयडी ईडीचा देशमुखां वर आरोप आहे.




