मंदिर आमच्यासाठी श्रध्देचा विषय आहे.- संजय राऊत

मुंबई : मंदिराचे एक अर्थकारण आहे मंदिराच्या अर्थकारणावर अनेक कुटुंब जगताहेत. मंदिराभोवती अनेक दुकाने सुरू असतात. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. पण मंदिर श्रद्धेचा विषय आहे. राजकारणाचा नाही असे सांगतानाच मंदिर सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील.अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
राऊत म्हणाले, मंदिर बंद करण्याचा किंवा लॉकडाऊन उघडण्याचा निर्णय हा केंद्रातच होता.काही राज्यात मंदिरे उघडली.त्याचे परिणाम सर्वांनी पाहिले आहेत.अयोध्या राम मंदिराचा पूजन आणि नंतर अनेकांना कोरोना झाला. पुजारीही त्यातून सुटले नाहीत.तिरुपती बालाजीचे मंदिर उघडलं तिथे काय झालं ? ते तुम्हाला माहीतच आहे.आम्ही देशभक्त आहोत देऊळ बंद करणे आम्हालाही आवडत नाही.
कोरोना हा मानवनिर्मित नाही केंद्रातील मंत्री म्हणतात की कोरोना की देवाची करणे आहे.असा टोलाही त्यांनी लगावला मंदिरे सुरु व्हावे म्हणून देवासाठी आम्ही झगडतो आहोत. कारण मंदिर हा आमच्या श्रध्देचा विषय आहे.



