महाराष्ट्र

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांनी उपोषण सोडले.

अकलूज : माळशिरस मधील पालखी महामार्ग-९६५ भूसंपादनात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे गेली दहा दिवस साखळी उपोषण सुरू होते. आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मध्यस्थी केल्याने शेतकऱ्यांनी लिंबू पाणी घेत उपोषण सोडले.

भरणे यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व उपोषणाला बसलेल्या वयस्कर शेतकऱ्यांच्या तब्बेतीचीची विचारपुस केली. दिनांक १६/०३/२०२० च्या शासन निर्णयाप्रमाणे माळशिरस मधील सर्व शेतकऱ्यांना गुणांक-२ प्रमाणे चारपट मोबदला देण्यात यावा.व भूसंपादन अधिकारी यांनी माळशिरस नगरपंचायत हद्दीमधील शेतकऱ्यांना चुकीचा दर देऊन निवाडा मंजुर केला आहे.

त्याचा त्वरीत निर्णय लावुन सर्व शेतकऱ्याना न्याय मिळुन देण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने स्वीकारून सर्व शेतकऱ्यांना उपोषण सोडण्याची भरणे यांनी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत सोपान(आप्पा) वाघमोडे वय(८२) यांना लिंबु पाणी देऊन उपोषण सोडले.

यावेळी नायब तहसिलदार तुषार देशमुख नामदेव काळे साहेब, ठाणे अंमलदार राहुल झांझुर्डे, अॅड. सोमनाथ वाघमोडे, आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये