कोथरूडमध्ये दि. १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान रंगणार ‘आमदार महोत्सव’; रंगभूमीवर यशस्वी 50 वर्षे निमित्त अभिनेते अशोक सराफ यांचा होणार सत्कार…

कोथरूड : कोथरूडकरांना दर्जेदार नाटकांची मेजवानी देण्यासाठी यंदाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून ‘आमदार महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या दि. १४ ते १६ नोव्हेंबरला भाजपचे अजित जगताप आणि सुजाता जगताप यांच्या वतीने हा नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या नाट्य महोत्सवामध्ये 14 नोव्हेंबर रोजी पहिल्या दिवशी प्रशांतदामले आणि वर्षा उसगावकर यांचे ‘सारखं काहीतरी होतंय’ हे नाटक, 15 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या दिवशी संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता देशमुख यांचे ‘नियम व अटी लागू’ नाटक आणि 16 नोव्हेंबर रोजी तिसऱ्या दिवशी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचे ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक प्रेक्षकांना यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे विनामुल्य पाहता येणार आहे.
याच दिवशी अभिनेते अशोक सराफ यांची रंगभुमीवरील यशस्वी ५० वर्षा निमित्त उच्च तंत्र शिक्षण मंत्री व कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचे आयोजक अजित जगताप यांनी सांगितले.




















































































