पुणे शहर
कोथरूडमधील हनुमाननगर टेकडीवर बिबट्या दिसल्याची चर्चा;नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

पुणे : कोथरूड मधील हनुमाननगर, वेताळ टेकडी परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. मात्र वनविभागाच्या वतीने अद्याप बिबट्या दिसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मात्र सतर्कता म्हणून गस्त वाढवली आहे.
गुरूवारी सायंकाळी आठ – नऊ वाजण्याच्या सुमारास हनुमाननगर, वेताळ टेकडी परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले नसल्याने या परीसरात बिबट्याचा वावर असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नाही.
दररोज या टेकडीवर सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी मोठया संख्येने नागरिक येतात. सतर्कता म्हणून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अशी माहिती नागरिकांनी दिली आहे.



