महाराष्ट्र

गोरेगावमध्ये इमारतीस भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू, तर 40 जण जखमी

मुंबई : गोरेगावमध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच ४० जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. अग्निशामक दलाने तातडीने मदतकार्य सुरू करत जवळपास ३० जणांना सुखरुप वाचवलं आहे. आगीचं स्वरुप गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.  

Img 20230812 wa0001281292979418231884101793

गोरेगाव पश्चिममधील जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीन वाजता आग लागली. ही इमारत पाच मजली आहे. या इमारतीच्या पार्किंगमध्ये ‘लेव्हल २’ स्वरुपाची आग लागली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. मृतांमध्ये १ पुरुष, तीन महिला आणि दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

Img 20230511 wa0002282292294772633607891151

आगीमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आगीत तळमजल्यावरील काही दुकानं आणि गाड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग मध्यरात्री लागल्याने झोपेत आग लागल्याचं उशिरा लक्षात आल्याने अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे मृतांचा आणि जखमींचा आकडा अधिक असल्याचंही बोललं जात आहे.

Img 20221228 wa000128229460950061152000874
Img 20230717 wa0012281294517541507444836162

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये