पुण्याहून दिल्लीला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान अचानक रद्द ; प्रवाशांची प्रचंड गैरसोय.. आज पहाटेचा प्रकार

पुणे : पुणे लोहगाव विमानतळावरून आज सकाळी ६.४० ला जाणारे पुणे दिल्ली एअर इंडिया एक्सप्रेस चे विमान अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. एअर इंडिया एक्सप्रेस च्या डेक्स समोर बसून प्रवाशांनी एअर इंडिया हाय हाय च्या घोषणा दिल्या.
आज सकाळी पुणे विमानतळावरून सकाळी ६.४० पुणे दिल्ली विमान उड्डाण करणार होते त्यासाठी दिल्लीला जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र अचानकपणे विमान रद्द झाल्याची माहिती एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.
यावेळी प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्याने प्रवाशी आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे कर्मचारी वादविवाद झाला. एअर लाईन प्रतिनीधी कडून प्रवाश्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत देण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. प्रवाशांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास ही एअर लाईन प्रतिनीधी टाळाटाळ करत होते. उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता.
या विमानाने दिल्लीला जाणारे प्रवाशी मंदार बलकवडे यांनी सांगितले की, विमान रद्द झाल्याचे प्रवाशांना एन वेळेस सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एअर लाईन व्यवस्थापन आधीच सर्व माहिती असती तरीही त्यांनी विमान रद्द झाल्याची पूर्वसूचना प्रवाशांना दिली नाही.एअर इंडिया एक्सप्रेसचे कर्मचारीही प्रवाशांना धड उत्तरे देत नसल्याने प्रचंड संतापाची भावना आहे.










