महाराष्ट्रराजकीय

शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आज न्यायालयात काय घडले?

शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप घेतला नाही. या निर्णयास विलंब होत होता. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना महत्वाचे निर्देश दिले. यामुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

सुप्रीम कोर्टात 16 आमदार अपात्र प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस दिली. या नोटिशीचे उत्तर दोन आठवड्यात देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान हे आदेश दिले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या खंडपीठात न्यायमूर्ती सिम्हा आणि न्या. मिश्ना यांची समावेश होता.

सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, 16 आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय द्यावयास हवा होता. परंतु दोन महिने उलटूनही या प्रकरणाबाबत निर्णय झालेला नाही. त्यांच्याकडून जाणीपूर्वक उशीर केला जात आहे, असा आरोप याचिकेत सुनिल प्रभू यांनी केला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याचे पालन झाले नसल्याची बाब याचिकेतून लक्षात आणून दिली आहे.

Img 20230707 wa00097391429386569165714
Img 20230708 wa0003
Img 20221228 wa00016208176808646242256
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये