पुणे शहर
मुळशी तालुक्यातील आंबवणे येथील आशाघरातून 5 मुले गायब

पुणे : मुळशी तालुक्यातील आंबवणे येथील संपर्क संस्थेच्या बाल आशाघरातून पाच मुले 25 जानेवारी रोजी संध्याकाळ पासून गायब आहेत. मुलांना फुस लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला असून त्यात दोन अनाथ मुलांचाही समावेश आहे. याबाबत पौड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लहु मोरे (वय 11 वर्षे) , गणपत भुरीया उघडे (वय 11 वर्षे), सागर वाघमारे (वय 12 वर्षे),अभिषेक गायकवाड (वय 17 वर्ष) आणि नवनाथ पाटोळे (वय 16 वर्षे) ही मुलं बेपत्ता झाली आहेत.
मुलांबाबत माहिती मिळाल्यास पौड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आले आहे.



